पाकिस्तानात पोलिस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला

कराची – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील लोरालाई जिल्ह्यातील एका पोलिस प्रशिक्षण केंद्रावर आत्मघाती पथकातील तीन दहशतवाद्यांनी आज हल्ला केला. त्यात एक पोलिस कर्मचारी ठार झाला. तसेच तिघेही हल्लेखोर त्यांनीच केलेल्या स्फोटात मरण पावले. या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रशिक्षण केंद्रात पोलिस भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची परिक्षा सुरू असताना हा हल्ला झाला.

हल्ल्याला तेथे तैनात असलेल्या सुरक्षा जवानांनीही त्वरेने प्रत्युत्तर दिले त्यांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. हा हल्ला प्रखर प्रतिहल्ला करून रोखल्याबद्दल त्या प्रांताचे मुख्यमंत्री जम कमलाखान अलयानी यांनी सुरक्षा जवानांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात आमचे सुरक्षा जवान कायमच तत्पर राहिले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)