डोंबिवलीत रिक्षाचालकाचे अपरहण करुन मारहाण

प्रातिनिधिक फोटो

भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कल्याण – डोंबिवलीत रिक्षाचालकाचे अपहरण करुन त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपच्या रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब कांबळे असे पिडीत रिक्षाचालकाचे नाव आहे. तो डोंबिवली पूर्वेच्या शेलार नाका परिसरात राहतो. शनिवारी रात्री त्याला काही जणांनी जानकी हॉटेल परिसरातून रिक्षात उचलून नेल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना मिळाली. त्यामुळे त्याचा भाऊ सिद्धार्थ याने घटनास्थळी धाव घेतली असता त्याचा भाऊ बाबासाहेब कांबळे हा रक्तबंबाळ अवस्थेत शेलार नाक्‍यावर पडलेला आढळून आला.

भाजपच्या रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर, रवी माळेकर आणि त्याच्या 5 ते 6 साथीदारांनी आपल्याला अपहरण करून उचलून नेले आणि अज्ञात स्थळी नेऊन रॉड, वायरच्या साहाय्याने मारहाण केल्याची माहिती कांबळेने दिली.

जखमी अवस्थेत त्याला तातडीने डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा भाजपच्या रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर, रवी माळेकर आणि इतर 5 ते 6 जणांच्या विरोधात अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)