इंदोर – काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिध्दू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. एका पत्रकार परिषदेत सिध्दू यांनी मोदींवर टीका करत त्यांची तुलना नव्या नवरीशी केली.
ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी त्या नव्या नवरीसारखे आहेत जी पोळ्या कमी लाटते पण बांगड्यांचा आवाजच अधिक करते. जेणेकरून पूर्ण गावाला माहिती व्हायला हवं की, ती किती काम करतेय.’ इंदोरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली. मोदी काम कमी आणि प्रचार जास्त करतात, असं विधान सिध्दू यांनी केलं.
Punjab Minister & Congress leader Navjot Singh Sidhu in Indore, MP: Modi Ji uss dulhan ki tarah hain jo roti kum baelti hai aur chudiyaan zada khankati hai taaki mohalle walon ko yeh pata chale ki woh kaam kar rahi hai. Bas yahi hua hai Modi sarkaar mein. pic.twitter.com/WOPJXbMm1x
— ANI (@ANI) May 11, 2019