नवी दिल्ली – दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवपल्या असतानाच आम आदमी पक्षासाठी अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. आम आदमी पक्षाचे पश्चिम दिल्ली लोकसभा मतदासंघातील उमेदवार बलबीर सिंह जाखर यांच्या मुलाने आज “माझ्या वडिलांनी लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना ६ कोटी रुपये दिले आहेत. माझे आरोप सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे ठोस पुरावे देखील आहेत.” असे गंभीर आरोप लावल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे.
दिल्लीमधील सातही लोकसभा मतदारसंघांमधील निवडणुका सहाव्या टप्प्यात पार पडणार असून येत्या १२ मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. अशातच आज आम आदमी पक्षाचे पश्चिम दिल्ली लोकसभा मतदासंघातील उमेदवार बलबीर सिंह जाखर यांचा मुलगा उदय याने एका व्हिडिओद्वारे आपल्या वडिलांनी उमेदवारीसाठी अरविंद केजरीवाल यांना पैसे दिल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, मुलाने लावलेल्या आरोपांबाबत बलबीर सिंह जाखर यांनी प्रतिउत्तर दिले असून ते म्हणाले, “मी माझ्या मुलासोबत कधीही माझ्या उमेदवारीबाबत चर्चा केली नाही. लग्नानंतर अवघ्या पाच-सहा महिन्यांमध्ये माझा व माझ्या पत्नीचा २००९मध्ये घटस्फोट झाला तसेच माझ्या मुलाचा ताबा देखील पत्नीकडे असल्याने माझं आणि त्याच जास्त प्रमाणात बोलणं देखील होत नाही. त्याने लावलेले आरोप खोटे आणि दुर्भाग्यपूर्ण आहेत.”
बलबीर सिंह जाखर यांनी मुलाद्वारे लावण्यात आलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले असले तरी विरोधकांकडून या प्रकरणाचा मुद्दा बनवला जाण्याची दाट शक्यता आहे.
#WATCH Aam Aadmi Party's West Delhi candidate, Balbir Singh Jakhar's son Uday Jakhar: My father joined politics about 3 months ago, he had paid Arvind Kejriwal Rs 6 crore for a ticket, I have credible evidence that he had paid for this ticket. pic.twitter.com/grlxoDEFVk
— ANI (@ANI) May 11, 2019
Balbir Singh Jakhar, AAP candidate from West Delhi: He stays at his maternal parents' home from the time of his birth and I divorced my wife in 2009. She stayed with me for only 6-7 months. His custody was granted to my wife after the divorce. https://t.co/hHbhXq0Gxr
— ANI (@ANI) May 11, 2019