अनैतिक कृत्ये चालणारी ठिकाणे होणार सील, कोल्हापूर पोलीस अधिक्षकांची माहिती

दोन पेक्षा जास्त वेळा कारवाई झालेले हॉटेल लॉज वर होणार कारवाई 

कोल्हापूर – अनैतिक व्यवसाय कुंटणखाने यावर दोन पेक्षा जास्त वेळा कारवाई होऊनही असे अड्डे पुन्हा सुरू असतील तर संबंधित हॉटेल लॉज किंवा सदनिका सील करण्यात येणार असल्याची माहिती शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी दिली आहे. यासंदर्भातील माहिती संकलनाचे काम सुरू असून असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

लॉज, यात्री निवासच्या नावाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लॉजमध्ये मोठया प्रमाणात वेश्या व्यवसाय, कुंटनखाने चालतात. अनैतिक व्यापार प्रतिबंधक विभागाचे पथक, तसच विशेष पथकाने लॉजवर छापे टाकून वेश्या व्यवसायांवर कारवाई केली आहे.मात्र तरीही काही ठिकाणी जबरदस्तीने परप्रांतीय महिला अल्पवयीन मुलीकडून हा व्यवसाय करून घेणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. या हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायावर कडक कारवाई चे संकेत पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.

अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंधक शाखा,निर्भया पथक तसेच विशेष पथकांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाई चा अहवाल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे मागवला आहे.यामध्ये दोन किंवा जास्त वेळा एखादे हॉटेल,लॉज अथवा खाजगी घरात कारवाई होऊन गुन्हे दाखल झाली असतील तर अशी ठिकाणे कायमची सील करण्यार असल्याचे डॉ.देशमुख यांनी आज सांगितले आहे.असे प्रकार एखाद्या ठिकाणी सुरू असतील तर त्यांची महिती पोलिसांना द्यावी तेथे तात्काळ कारवाई केली जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.देशमुख यांनी केले आहे.

या आधी ही प्रयत्न…

पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी याच प्रकारे वारंवार कारवाई होऊन ही अनैतिक व्यवहार चालणाऱ्या 21 लॉज ची यादी तयार केली होती. त्यांचे परवाने रद्द करावेत यासाठीचा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकारी कार्यलया कडे पाठवला होता.मात्र तांत्रिक कारणामुळे हिं करवाई होऊ शकली नव्हती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)