दुचाकी दुभाजकला धडकून तरुणाचा मृत्यू

पिंपरी – भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी स्पीडब्रेकरवरुन उडून डिव्हायडरला धडकली. या घटनेत जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात कासारवाडी स्मशानभूमी रस्त्यावरील हॉटेल किनाराजवळ घडला. कुंदन रमेश मोरे (वय 27, रा. गोविंद पॅलेस, काळेवाडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कुंदन हा 10 डिसेंबर 2018 रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात दुचाकीवरुन कासारवाडीतील स्मशानभुमीच्या रस्त्याने चालला होता. यावेळी, अचानक त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला त्यामुळे दुचाकी स्पीडब्रेकरवरुन उडून डिव्हायडरला जाऊन धडकली. यामध्ये दुचाकीस्वार कुंदन हा गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)