नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज वाढदिवस होता. त्यानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो असे मोदींनी या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. नंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटरला प्रतिसाद देत मोदींचे आभार मानले.
लोकसभा निवडणूक काळात या दोन्ही नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी एकमेकांविषयी असा सन्मान व्यक्त करण्याला विशेष महत्व आहे. दरम्यान अनेक राजकीय नेत्यांनीही राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या असून कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. पत्रकारांनाही राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी राहुल यांनी त्यांना मिठाई देऊन त्यांचे आभार मानले.