तक्रार केल्याच्या रागातून मारहाण

पिंपरी – भांडणाची पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून सात ते आठ जणांच्या टोळक्‍यांनी घरात घुसून तिघा जणांना बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना शुक्रवार (दि. 5) रात्री सव्वानऊच्या सुमारास चिंचवड येथील रामनगर येथे घडली. याप्रकरणी सचिन अंकुश कुसाळकर (वय-38, रा. रामनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, कृष्णा देवकर, पवन लष्करे (रा. रामनगर, चिंचवड) आणि त्यांच्या 7 ते 8 अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन कुसाळकर यांचा पवन आणि कृष्णा सोबत वाद झाला होता. याविरोधात सचिनने पोलिसांत तक्रार दिली. या रागातून कृष्णा व पवन यांनी साथीदारांसोबत सचिनच्या घरावर हल्ला केला. सचिनला लाकडी दांडक्‍याने मारहाण केली तर नवीन भोसले आणि राहुल वेताळे यांना कोयता व सिमेंटचे गट्टूने जबर मारहाण केली. घटनेनंतर आरोपी पसार झाले. अधिक तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) अन्सार शेख करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)