नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार आझम खान यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आझम खान यांनी नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनवरून चर्चेत असलेल्या प्रज्ञा ठाकूर यांच्या आडून भाजपाला लक्ष्य केलं आहे. वृत्त माध्यमांशी संवाद साधताना आझम खान म्हणाले की, ‘मदरशांमध्ये नथुराम गोडसे आणि प्रज्ञा सिंह ठाकूर सारखे लोक जन्माला येत नाहीत.’
Azam Khan, SP: Religious teachings are imparted at madrasas. At the very same madrasas, English, Hindi & Maths are taught. This has always been done. If you want to help, improve their standard. Build buildings for madrasas, provide them furniture & midday meal facility. (11.06) pic.twitter.com/ElxM5c7Crl
— ANI UP (@ANINewsUP) June 11, 2019
यावेळी वृत्त माध्यमांनी त्यांना मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या मोदींच्या भूमिकेवर विचारलेल्या असता ते म्हणाले, मदरशात नथुराम गोडसेच्या स्वभावाची माणसं अन् प्रज्ञा ठाकूरसारख्या व्यक्ती जन्माला येत नाहीत. दहशतवादी कारवायात सहभागी असलेल्या लोकांचं उदात्तीकरण होऊ शकत नाही.’ असेही ते म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रचारदरम्यान समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे एजंट असल्याचे वक्तव्य आझम खान यांनी केले होते.