अमेरिकेतील गोळीबारात 1 ठार; 3 जखमी

वॉशिंग्टन – कॅलिफोर्निया राज्यातील पोवे शहरामध्ये ज्यू समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान एका व्यक्‍तीने केलेल्या गोळीबारात किमान 1 जण ठार झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. हा गोळीबार द्वेषभावनेतून करण्यात आला असावा, असा अंदाज पोवे शहराचे महापौर स्टीव्ह वौस यांनी व्यक्‍त केला आहे. ज्यू धर्मियांच्या विशेष धार्मिक सभेसाठी छाबडमध्ये अनेक जण जमा झाले होते. यावेळी हा गोळीबार झाला.

सकाळी साडे 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या गोळाबारात एकूण चौघांना गोळ्या लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये दोन पुरुष आणि एक लहान मुलगी जखमी होते. मात्र त्यांच्या जीवाला धोका नाही, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. या गोळीबारादरम्यान हल्लेखोर जोरजोराने ओरडत होता. त्याने एकूण 5-6 गोळ्या झाडल्या, असे एका प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगितले. मात्र या गोळीबारानंतर हल्लेखोर कोठे गेला, हे समजू शकले नाही. त्याचा शोध सुरू आहे. सभागृहातील सर्वांना सुरक्षा पुरवण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)