देहूरोडमधील नऊ हजार मतदार वगळले

अंतिम मतदार यादी 15 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार
हरकती, दुरुस्ती व नवीन नावे समाविष्ट करण्यासाठी 20 जुलैअखेर मुदत 

देहूरोड  – देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत शासकीय जमिनीवर बांधकाम करून (अतिक्रमण) राहणाऱ्या नऊ हजार दोनशे साठ मतदाराची नावे वगळण्यात आली आहेत. या बोर्डाच्या निर्णयामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेल्या मतदार राजाचे मतदानाचा हक्‍क हिरावला अशी प्रतिक्रिया व्यक्‍त केली जात आहे. वार्ड क्र. तीन मध्ये सर्वाधिक मतदार घटल्याने मतदाराची संख्या कमी झाल्याने उर्वरित 23 हजार 165 मतदारांच्या संख्येमुळे वार्डाची फेररचनाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. या भूमिकेमुळे काही आजी-माजी नेते, राजकीय पदाधिकारी, नगरसेवकांचा मतदार यादीतून नावे नसल्यामध्ये समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मतदार यादीतून नावे कमी झालेले नव्याने प्रारूप मतदार यादी देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना ही मतदार यादी पाहण्यासाठी कॅंटोन्मेंट कार्यालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. तसेच 20 जुलैपर्यंत नाव व पत्त्यात दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ट करणे, यादीतील नावांबद्दल हरकती व सूचना विहित नमुन्यात कॅंटोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार आहे.

मतदारयादीतून नऊ हजार 260 मतदार झाले कमी कॅंटोन्मेंट बोर्डाची मतदार यादी बनविताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कॅंटोन्मेंट हद्दीतील संरक्षण जागांवर अतिक्रमण करून घरे बांधली. या जागेत राहणाऱ्या संबंधित मतदारांची नावे मतदार यादीत घेण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी 2016 साली प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतून अतिक्रमित मतदारांना वगळण्यात आले होते.

मात्र सर्वपक्षीय आंदोलन झाल्यानंतर कॅंटोन्मेंट बोर्डाने कायदेशीर सल्ला घेत सरकारी जागांवर अतिक्रमण करून बांधलेल्या ज्या घराची बोर्डाच्या महसूल विभागात कर आकारणीसाठी नोंद करण्यात आलेली आहे, अशा घरांत राहणाऱ्या नागरिकांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली होती. मात्र प्रशासनाने पुन्हा कायदेशीर सल्ला घेत संबंधितांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)