अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखातीच्या प्रश्नांची यादी मोदींनीच दिली असणार – जयंत पाटील 

संग्रहित छायाचित्र...

मुंबई – अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज खास मुलाखत घेतली. यावेळी मोदींनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. या मुलाखतीवर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखातीच्या प्रश्नांची यादी मोदींनीच दिली असणार, अशी टीका केली आहे.

जयंत पाटील म्हणाले कि, माझेच प्रश्न आणि माझीच उत्तरे ही नरेंद्र मोदींची वृत्ती कायम आहे. अक्षयकुमारने नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली नसून मोदींनी अक्षयकुमारला प्रश्न विचारायला सांगितलं आहे. प्रश्नांची यादीही मोदींनीच दिली असणार! मोदीजी, जरा रविशकुमारलाही एखादी मुलाखत द्या की!, अशी टीका त्यांनी केली आहे.

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1120941732932222976

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)