…म्हणून मोदी घालतात उलटे घड्याळ

नवी दिल्ली – पहिल्यांदाच मोदींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न मुलाखतीतून अभिनेता अक्षय कुमारने केला आहे. या मुलाखतीतून मोदींनी आयुष्यातले अनेक पैलू उलगडले आहेत. यावेळी मोदींनी स्वतःच्या आवडी-निवडीबद्दल अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.

या मुलाखतीमध्ये अक्षय कुमारने नरेंद्र मोदी यांना आपल्या घड्याळ घालण्याच्या सवयीबद्दल प्रश्न विचारला असता मोदी म्हणाले, ‘मी अनेकदा मीटिंगमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिलं तर माझ्या या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकतं. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घालतो कारण वेळ पाहायचा झाल्यास समोरच्या लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहता येतो,’ असं स्पष्टीकरण नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.