मोदींनी कॅमेरे लावले आहेत, मत दिले नाही तर… – भाजप आमदार 

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या वक्तव्यावर कडक कारवाई केली असूनही नेते वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. गुजरातमधील दाहोद येथील भाजप आमदाराने प्रचार करताना जनतेला थेट धमकविले आहे.

भाजप आमदार रमेश कटारा यांनी म्हंटले कि, ईव्हीएम मशीनमध्ये जसवंत भाभोर (दाहोद जागेवरील उमेदवार) यांचा फोटो असेल. त्याच्यासमोरच कमळ चिन्हाचे बटन असेल. ते बघताच दाबावे. कोणतीही चुक झाली नाही पाहिजे. कारण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केंद्रावर कॅमेरे लावले आहेत. तुम्ही भाजपला सोडून काँग्रेस उमेदवाराला मत दिले तर तात्काळ कॅमेरात दिसेल. मोदीसाहेबांनी आता तर आधार कार्ड, रेशन कार्डवर फोटो लावले आहेत. त्यावरून तुमची ओळख होईल. तुमच्या मतदान केंद्रामध्ये कमी मते मिळाली तर कोणी मत दिले नाही याची ओळख होईल आणि तुम्हाला काम मिळणे बंद होईल, अशी थेट धमकविणारे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here