निरव मोदीच्या कोठडीत २७ जूनपर्यंत वाढ

लंडन:  भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या हिरे व्यापारी निरव मोदी याच्या संकटांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज लंडन येथील कोर्टाने निरव मोदीच्या कोठडीत २७ जूनपर्यंत वाढ केली आहे. या संदर्भात पुढील सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे.

भारतीय बँकांचे पैसे बुडवणारा निरव मोदी हा लंडन येथे वास्तव्यास असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. यानंतर लंडन येथील वेस्ट मिनिस्टर कोर्टाने निरव मोदीच्या अटकेचे आदेश दिले होते.

यापूर्वी, निरव मोदीच्या वकिलांकडून निरव मोदीला नजकैदेत, इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या द्वारे लक्ष ठेवण्याच्या अटीवर त्याचा जामीन मंजूर करावा, असा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. परंतु त्यावेळी वेस्ट मिनिस्टर कोर्टाने हा अर्ज नाकारत, निरव मोदीचा जामीन फेटाळला होता.

https://twitter.com/ANI/status/1134044945981906944

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)