नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी नेपाळचे पंतप्रधान दिल्लीत

नवी दिल्ली –लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी यांचा आज सायंकाळी ७च्या सुमारास शपथविधी होणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर आज दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आजच्या या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ‘नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली’ देखील राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आज शपथविधी सोहळ्याला सुमारे 8 हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आदी विरोधी पक्षनेत्यांबरोबरच बिमस्टेक देशांचे प्रमुख, उद्योगपती, चित्रपट तारे, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)