अमित शहांना केंद्रीय मंत्रिपद; गुजरातच्या भाजप अध्यक्षांचे ट्विट

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अन्य खासदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याचे गुजरातचे भाजप अध्यक्ष जितू वाघवानी याणी ट्विट केले आहे.

लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर होताच त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा सुरू झाली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपाने तब्बल 303 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 350 चा आकडा ओलांडला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मोदी यांचे विश्‍वासू साथीदार म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांना केंद्रात महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.