#IPL2019 : पराभवाची परतफेड करण्याची मुंबईला संधी

-घरच्या मैदानावर राजस्थान विजय मिळवणार का?

-फलंदाजांची क्रमवारी ठरवण्याचे रहाणेपुढे आव्हान

-संघ निवडीची रोहितपुढे डोकेदुखी

जयपुर – आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिल्या सामन्यापासून चांगली कामगिरी करुनही शेवटच्या क्षणी पराभव पत्करावा लागल्यामुळे क्रमवारीत खालून दुसरे स्थन राखून ठेवलेल्या राजस्थान रॉयल्स समोर क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असून मुंबईकडे राजस्थानकडून झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे.

यंदाच्या मोसमात मुंबईने आपल्या नऊ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला असून त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचे 12 गुण झालेले असून ते सध्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहेत. यावेळी त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला असून त्यांना राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्ससंघा विरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात राजस्थानचा पराभव करुन पहिल्या सामन्यातील झालेल्या पराभवाची परतफेड मुंबईचा संघ करेल का हे पहाने औत्सुक्‍याचे ठरनार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
वेळ दु. 4.00 वा
स्थळ – सवाई मानसिंग मैदान, जयपुर

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या संघाचे यंदाच्या मोसमातील आव्हान जवळपास संपुष्टात आले असून त्यांनी आता पर्यंत आपल्या आठ सामन्यांपैकी केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलेला असून सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. ज्यात त्यांनी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केलेला असून चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स या संघांकडून पराभव स्विकारला आहे. त्यामुळे त्यांचे केवळ चार गुण झालेले असून त्यांना क्रमवारीत खालून दुसरे स्थान मिळाले आहे.

राजस्थानच्या संघाला प्रामुख्याने मधल्या फळीतील खेळाडूंच्या अपयशाने पराभवाचा सामना करावा लागला असून सर्वच सामन्यात चांगली सुरूवात मिळूनही केवळ मधल्या फळीतील फलंदाजांनी घेतलेल्या अतिरीक्त तणावामुळे त्यांना अनेक सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. तर, यावेळी कर्णधार अजिंक्‍य रहाणेला संघातील फलंदाजांच्या क्रमवारीत बदल करुन प्रयोग करण्याची गरज असल्याचे गत सामन्यात स्टुअर्ट बिन्नीने केलेल्या फटकेबाजीमुळे समजून आले.

पंजाब विरुद्धच्या सामन्यात जर स्टुअर्ट बिन्नी वरच्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला असता तर सामन्याचा निकाल नक्‍कीच राजस्थानच्या बाजुने लागला असता. त्यामुळे आजच्या सामन्यात अजिंक्‍य रहाणेला क्रमवारीत बदलाव करुन थोडे फार प्रयोग करण्याची गरज आहे.तर, दुसरीकडे सर्व सामन्यात सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादवच्या जागी युवराज सिंग अथवा इशान किशन अथवा सिद्धेश लाडला संधी देण्याची गरज असून अंतिम संघ निवडताना रोहित शर्माच्या नेतृत्वाची आज कसोटी लागणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्‍लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, रसिक सलाम, अल्झारी जोसेफ.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एश्‍टॉन टर्नर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)