IPL 2024, Rajasthan Royals vs Mumbai Indians Match 38 : आज आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघ राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे, तेव्हा त्यांच्या गोलंदाजीतील उणीवा दूर करून यजमान संघाचा बदला घेण्याकडे लक्ष असेल. उभय संघांमधील अखेरच्या सामन्यात राजस्थानने घरच्या मैदानावर मुंबईचा सहा गडी राखून पराभव केला होता.
राजस्थानचा संघ यंदाच्या मोसमात 7 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. मुंबई संघ 7 पैकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, राजस्थान आणि मुंबई यांच्यापैकी आयपीएलमध्ये कोणाचा वरचष्मा आहे.
याच मोसमात मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत केवळ 4 गडी राखून लक्ष्य सहज गाठले. हा सामना जिंकून मुंबईला राजस्थानकडून मागील पराभवाचा बदला घ्यायचा आहे.
RR vs MI : Head to Head Records….
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 29 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी राजस्थानने 13 तर मुंबईने 15 सामने जिंकले आहेत. तर एक सामना रद्द झाला. म्हणजे दोन्ही संघांमध्ये विजयाचे अंतर फारसे नाही आणि त्यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे.
RR vs MI : जयपूरची खेळपट्टी कशी असेल? (Pitch Report)
राजस्थान आणि मुंबई यांच्यातील हा सामना सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनाही येथे फायदा होतो. त्याच वेळी, मैदानाचा आकार मोठा असल्याने, या मैदानावर बॉलर्सना चौकार लावणे थोडे कठीण होऊ शकते. या मैदानावर नाणेफेक जिंकल्यानंतर संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.