#IPL2019 : राजस्थान रॉयल्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

जयपुर – आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना आज रंगणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सकडून लागला असून त्यांनी गोलंदाजी स्विकारत प्रथम मुंबई इंडियन्स संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

यंदाच्या मोसमात मुंबईने आपल्या नऊ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला असून त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचे 12 गुण झालेले असून ते सध्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहेत.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या संघाचे यंदाच्या मोसमातील आव्हान जवळपास संपुष्टात आले असून त्यांनी आता पर्यंत आपल्या आठ सामन्यांपैकी केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलेला असून सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे त्यांचे केवळ चार गुण झालेले असून त्यांना क्रमवारीत खालून दुसरे स्थान मिळाले आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिल्या सामन्यापासून चांगली कामगिरी करुनही शेवटच्या क्षणी पराभव पत्करावा लागल्यामुळे क्रमवारीत खालून दुसरे स्थान राखून ठेवलेल्या राजस्थान रॉयल्स समोर क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचे आव्हान असून मुंबईकडे राजस्थानकडून झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.