जॉन्सनच्या उत्पादनाची चाचणी निर्धोक

नवी दिल्ली – राजस्थान एफडीएकडून जॉन्सन बेबी शॅम्पूमध्ये फॉर्माल्डेहाइड (तीव्र जंतूनाशके) नसल्याची पुष्टी देण्यात आली असल्याचे कंपनीच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

या निष्कर्षामुळे आमच्या चाचणीची तसेच जॉन्सन बेबी शॅम्पूमध्ये फॉर्माल्डेहाइड किंवा फॉर्माल्डेहाइड मुक्त करणारे घटक नसल्याची आम्ही देत असलेली खात्री यांचीही पुष्टी झाली आहे. दंडाधिकारी न्यायालयाने पुनर्चाचणीचा आदेश दिल्यानंतर न्यायासन प्रयोगशाळेने दिलेला हा निकाल आहे, असे प्रवक्‍त्याने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)