पिंपरी – बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना 16 जून ते 17 जून दरम्यान सांगवी येथील विशालनगर परिसरात घडली. याप्रकरणी रोहित भालचंद्र निगडे (वय-27) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रविवार (दि.16) रोजी घर बंद करुन बाहेर गेले होते. दरम्यान चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि 39 हजार 500 रुपये किंमतीचे 17 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. याबाबत सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.