हिजबुलमुजाहिद्दीनच्या पाच दहशतवाद्यांना अटक

file photo

श्रीनगर – जम्मू-कश्‍मीरमध्ये सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु असतांना आज शोपियान भागात  जवानांनी हिजबुलमुजाहिद्दीनच्या पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून आयडी स्फोटक देखील जप्त करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांची पोलिसांच्या व जवानांच्या शोधमोहिमेच्या मार्गावर स्फोटक लावून हल्ला घडवून आणण्याची योजना होती. याप्रकरणी शोपियान परिसरात जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)