श्रीनगर – जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु असतांना आज शोपियान भागात जवानांनी हिजबुलमुजाहिद्दीनच्या पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून आयडी स्फोटक देखील जप्त करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांची पोलिसांच्या व जवानांच्या शोधमोहिमेच्या मार्गावर स्फोटक लावून हल्ला घडवून आणण्याची योजना होती. याप्रकरणी शोपियान परिसरात जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
Jammu & Kashmir: Police in Shopian has busted a terror module of Hizbul Mujahideen, arrested 5 terrorists and recovered a sophisticated IED. The terrorists were planning to target police & security forces by planting explosives during their movement in the area; further probe on. pic.twitter.com/PwCciE2G81
— ANI (@ANI) June 19, 2019