“अर्थ’च्या हिंदी रीमेकमध्ये स्वराची इंट्री 

महेश भट्‌ट यांचा 1982मध्ये प्रदर्शित झालेला “अर्थ’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. या चित्रपटात शबाना आझमी, स्मिता पाटील, राज किरण आणि कुलभूषण खरबंदा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या सर्व कलाकारांसाठी हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण आहे. आता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये शबाना आझमीच्या भूमिकेत स्वरा भास्कर झळकणार आहे. महेश भट्‌ट यांनी 2017मध्ये “अर्थ’ चित्रपटाचा हिंदी रिमेक काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही शबाना यांची भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता जॅकलीनच्या जागी स्वरा भास्करला साईन करण्यात आले असल्याचे समजते.

स्वराने “अर्थ’ चित्रपट पाहिला असून तिला तो खूपच आवडला आहे. जेव्हा चित्रपटातील भूमिकेबाबत तिला ऑफर देण्यात आली, तेव्हा तिने लगेच होकार दर्शविला. ती आता लवकरच चित्रपट साईन करणार आहे. स्वरा ही “निल बटे सन्नाटा’नंतर पुन्हा एकदा महिला दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. दरम्यान, “अर्थ’चा हिंदी रिमेक रेवती डायरेक्‍ट करणार आहेत. या चित्रपटाच्या तमिळ रिमेकमध्ये रेवतीने शबाना आझमीची भूमिका साकारली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.