कास मारहाण अनोळखी तरुणाकडून घरी सोडविण्यासाठी जबरदस्ती
पिंपरी – रस्त्यावर अनोळखी तरण-तरुणीची भांडणे सुरू होती. तिथून जात असलेल्या उद्योजकाने ही भांडणे सोडवली नाहीत, तसेच भांडण करणाऱ्या अनोळखी लोकांना त्यांच्या घरी सोडवले म्हणून त्या उद्योजकास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हालगौडा शिवलिंग ओंकार (वय 44, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
हालगौडा यांची भोसरी एमआयडीसी भोसरी येथे कंपनी आहे. गुुरुवारी हालगौडा कंपनीत गेले होते. सायंकाळी कंपनीत चक्कर मारुन ते कंपनीच्या बाहेर आले. कंपनीच्या बाहेर रस्त्यावर तीन व्यक्ती आणि एका तरुणी यांची आपसात भांडणे सुरु होती. हालगौडा यांनी त्या भांडणांकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या कारने पुढे जाऊ लागले. दरम्यान भांडण करत असलेल्या इसमांपैकी एकजण कारपुढे आला आणि आमच्यातील भांडणे सोडवा व आम्हाला आमच्या घरी नेऊन सोडा, असे सांगू लागला. त्यापैकी कोणालाही ओळखत नसल्याने हालगौडा यांनी हस्तक्षेप करण्यास व घरी नेऊन सोडण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या व्यक्तीने हालगौडा यांना जबर मारहाण करुन जखमी केले.