उत्तरप्रदेशातील अपघातात एकाच कुटुंबातील आठ जण ठार

मथुरा – ताजमहाल पहाण्यासाठी आग्रा शहराकडे मोटारीतून निघालेल्या ग्रेटर नॉयडातील एका कुटुंबाची मोटार अपघातग्रस्त होऊन त्यात त्या कुटुंबातील आठ जण ठार झाल्याची घटना आज उत्तरप्रदेशातील मथुरा जिल्ह्यात घडली. त्यांची कार यमुना एक्‍स्प्रेस हायवेवर ट्रकला धडकून हा अपघात झाला.

मथुरा शहरापासून तीस किमी अंतरावर हा अपघात झाला. त्यात पाच जण जागेवरच ठार झाले तर अन्य तीन जण रूग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावले. ट्रकला ही कार इतक्‍या वेगाने धडकली की तिचा पार चेंदामेंदा झाला. ट्रकच्या खाली घुसलेली कार बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला.

यमुना एक्‍स्प्रेस वे हा 165 किमीचा महामार्ग आहे. त्या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहन चालवली जातात त्यामुळे दर वर्षी तेथे मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा रस्ता ग्रेटर नॉयडा आणि आग्रा शहरांना जोडतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)