राष्ट्रीय स्क्‍वॅश स्पर्धेत माणगावकर, चिनप्पा विजेते

पुणे – महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू महेश माणगावकर याने वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेतील पुरुषांच्या विभागात अजिंक्‍यपद पटकाविले. महिलांमध्ये हा मान जोत्स्ना चिनप्पा हिला मिळाला.

स्पर्धेतील अंतिम सामन्यात माणगावकर याने आपलाच सहकारी अभिषेक प्रधान याचा 12-10, 11-7, 11-9 असा पराभव केला आणि अग्रमानांकन सार्थ ठरविले. 35 वर्षावरील गटात दिल्लीच्या अमितपाल कोलली याने विजेतेपदाला गवसणी घातली. त्याने अव्वल मानांकनास साजेसा खेळ करीत महाराष्ट्राच्या आदित्य माहेश्‍वरी याला 11-6, 11-8, 4-11, 11-3 असे पराभूत केले.40 वर्षावरील सामन्यात छत्तीसगडच्या सौरभ बाबर याने अजिंक्‍यपद मिळविले. त्याने अंतिम लढतीत व्यावसायिक विभागात मात्र महाराष्ट्राच्या अभिनव सिन्हा याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

राजस्थानच्या विकास जांगरा याने त्याच्यावर 11-8, 11-5, 11-2 अशी मात केली. महाराष्ट्राच्या सचिन जाधव याला 11-9, 11-4, 11-9 असे हरविले. महिलांच्या अंतिम फेरीत चिनप्पा हिला तामिळनाडूच्या सुनयना कुरुविला हिने चांगली लढत दिली. तथापि जागतिक स्तरावर्रील स्पर्धांचा अनुभवाचा फायदा घेत चिनप्पा हिने 1-5, 11-4, 7-11, 11-5 असा विजय मिळविला.

पारितोषिक वितरण समारंभ सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते झाला. या वेळी भारतीय स्क्‍बॅश महासंघाचे अध्यक्ष देवेंद्रनाथ सारंगी, महाराष्ट्र स्क्‍बॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे, सचिव डॉ. ए. दयानंदकुमार, तसेच कालीदास मगर, आनद लोहोटी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.