#DCvRCB : नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाजीचा निर्णय

दिल्ली – आयपीएलच्या बाराव्या मोसमातील सर्वात समतोल असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला यंदाच्या मोसमात बाद फेरीत पोहोचण्यास एक विजयाची आवश्‍यकता असून आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ गाठण्यास दिल्लीचा संघ उत्सुक असणार असून बंगळुरूच्या संघाचा एक पराभव त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपवण्यास कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे बंगळुरूचा संघ आपला विजयरथ कायम राखण्यास उत्सुक असणार आहेत.

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात दिल्ली येथील फिरोज शाह कोटला मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीची कौल हा दिल्ली कॅपिटल्सकडून लागला असून दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात सर्वात खराब सुरुवात अनुभवलेल्या बंगळुरूच्या संघाने लागोपाठ सहा पराभवांनंतर विजय मिळवत स्पर्धेत पुनरागमन केले असून आता केवळ एक पराभव त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात बंगळुरूला विजय मिळवणे अत्यावश्‍यक असून यंदा त्यांनी 11 पैकी सात सामन्यांत पराभव तर चार सामन्यात विजय मिळवला असून सध्या क्रमवारीत अखेरच्या स्थानी आहेत. त्यातच त्यांचे केवळ तीन सामने बाकी असून आगामी तीनही सामने जिंकल्यास त्यांचे चौदा गुण होतील त्यामुळे त्यांना बाद फेरी गाठण्यास रनरेटचा आधार घ्यावा लागणार आहे.

दिल्ली कैपिटल्स :

पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शेरफेन रूदरफोर्ड, कॉलिन इनग्रॅम, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कगिसो रबाडा, इशांत शर्मा, संदीप लामिछाने

रॉयल चैलेंजर्स बैंगलोर :

पार्थिव पटेल, विराट कोहली, एबी डी विलियर्स, मार्कस स्टोइनिस, हेनरिक क्लासेन, गुरकिरत सिंह मान, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, नवदीप सैनी, युज़वेंद्र चहल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)