जेट एअरवेज कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या

नवी दिल्ली – जेट एअरवेज बंद होण्याला कोण कारणीभूत आहे त्यावरून आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू झाला आहे. बॅंकांकडून जेटच्या प्रवर्तकांना जबाबदार ठरवले जात आहे. जेटची विमान उड्डाणे कायम ठेवण्यासाठी तत्काळ निधी मिळायला पाहिजे होता असे प्रवर्तकांचे म्हणणे आहे.

आरोप-प्रत्यारोपांमध्ये कर्ज देणाऱ्या बॅंकांनी किंवा प्रवर्तकांनी कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार देण्यासाठी पैसे दिले नाहीत. वेतन न मिळाल्यामुळे कर्मचारी समस्यांचा सामना करत असून हे असेच चालू राहिले तर कर्मचाऱ्यांकडे दुसरी नोकरी बघण्याशिवाय पर्याय उरणार नाही. दुर्देवाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैस देण्यास बॅंकांनी असमर्थता दर्शवली आहे.

आमचे काही कर्मचारी या कंपनीसाठी खूप महत्त्वाचे आहेत पण त्यांच्याकडे दुसरीकडे नोकरी बघण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा कंपनीच्या शेअर होल्डर्सनी यावर तोडगा काढावा असे बॅंकांकडून उत्तर मिळाले. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनसाठी प्रवर्तक आणि शेअर होल्डर्सकडून तत्काळ निधी उपलब्ध व्हावा यावर बरीच चर्चा झाली. पण त्यातून अनुकूल काही घडले नाही असे जेटचे सीईओ विनय दुबे यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.