देहुरोड – देहूगाव डॉ. आंबेडकर चौकातील पोलीस चौकीलगतच एका 35 वर्षीय तरूणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. शुक्रवारचा आठवडे बाजार आणि भर गर्दीची वेळ असताना हा खून झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शंकर दत्तात्रय बाळसराफ (वय 35, रा. माळवाडी, देहूगाव) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव येथील इंद्रायणी नदी पुलाजवळ डॉ. आंबेडकर चौकातील पोलीस चौकीलगतच 35 वर्षीय शंकरचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. घटनास्थळावर देहुरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे यांचे पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी रात्रीउशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.