बालविवाहानंतर छळ, मारहाण अन्‌ गर्भपात

पिंपरी – अल्पवयीन मुलीवर दबाव आणून बेकायदेशीर रित्या तिचे लग्न केले. लग्नानंतर ती गरोदर राहिल्यावर मारहाण करुन तिचा गर्भपात केल्याचा धक्‍कादायक प्रकार चिखली येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती अक्षय धनाजी जाधव (वय-24), सासू पुष्पा धनाजी जाधव (वय-40) सासरे धनाजी किसन जाधव (वय-45 सर्व रा. जाधववस्ती, वडगाव शिंदे), पतीची आत्या रुक्‍मिणी गायकवाड (वय-55 रा. मोशी), ननंद अश्‍विनी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.