कर्ज फेडण्यासाठी पत्नीचा छळ

पिंपरी – लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावत पतीने पत्नीचा छळ केल्याची घटना चिखली येथे उघडकीस आली.

याप्रकरणी या महिलेचा पती शरद शांताराम घोलप, दोन नणंदा व दीर यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत 23 वर्षीय पीडितेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांची देणी मला द्यायची आहेत, मला पैशांची गरज आहे. तुझ्या आईकडून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत शरद याने त्याच्या पत्नीचा मानसिक व शारिरीक छळ केला. त्याच्या बहिण व भावानेही त्याला साथ दिली. हा त्रास सप्टेंबर 2016 पासून सुरु होता. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने चिखली पोलिसांत धाव घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)