भांडण सोडविणाऱ्यास दगडाने मारहाण

पिंपरी -मुलांचे भांडण सुरु असताना का भांडताय म्हणत विचारपूस करणाऱ्या इसमालाच शिवीगाळ करत दगडाने मारहाण केल्याची घटना रहाटणी येथे घडली आहे. किरण नानाजी देवरे (वय-37 रा.रहाटणी) यांनी फिर्याद दिली असून सुनील ठाकूर व त्याचा मित्र (नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व इतर मुलांमध्ये भांडण सुरु होती. यावेळी किरण तेथे विचारपूस कऱण्यास गेले असता त्यांनाच शिवीगाळ करत दगडाने मारहाण करण्यात आली. यावेळी किरण यांचा मित्र राहुल ही भांडणे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)