कुणी माझ्या मुलभूत अधिकारांचा भंग कसंकाय करु शकतं?

न्यायालयाच्या निर्णयावर रिचा पटेल हिची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अटक आणि शिक्षा मिळालेल्या रांची विमेन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिचा पटेल हिने कुराणचे वाटप करायला सांगणे हे माझ्या मुलभूत अधिकारांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने आक्षेपार्ह पोस्टबाबत शिक्षा म्हणून रिचाला कुराणच्या प्रत वाटप करण्याचे आदेश दिले आहेत त्यावरच रिचाने प्रतिक्रिया दिली.मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करते, पण फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या  केंद्रावर जाऊन त्यांचा धर्मग्रंथ कुराणच्या प्रती वाटण्याच्या आदेशामुळे मी अस्वस्थ झाले आहे. मला खूप वाईट वाटतंय. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते पण त्याचसोबत मला उच्च न्यायालयात माझी बाजू मांडण्याचाही अधिकार आहे. कुणी माझ्या मुलभूत अधिकारांचा भंग कसंकाय करु शकतं? फेसबुकवर स्वतःच्या धर्माबाबत लिहिणं कोणता गुन्हा आहे? मी एक सामान्य विद्यार्थिनी असतानाही मला अचानक अटक करण्यात आली असल्याचे रिचाने म्हटले.

ज्या फेसबुक पोस्टसाठी मला अटक करण्यात आली ती पोस्ट मी नरेंद्र मोदी फॅंस क्‍लब नावाच्या एका ग्रुपवरुन कॉपी केली होती आणि नंतर माझ्या फेसबुक पेजवर टाकली होती. त्या पोस्टमध्ये इस्लाविरोधात काहीही नव्हतं. अद्याप मला न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळालेली नाही. प्रत मिळाल्यानंतर कुराण वाटप करण्याच्या आदेशाचं पालन करावं की याविरोधात उच्च न्यायालयात धाव घ्यायची हा निर्णय घेईनअसंही ती म्हणाली. रिचा पटेल पदवीच्या अंतिम वर्षात असून आपल्या कुटुंबियांसह ती रांचीतील पिठोरिया येथे राहते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)