बीसीसीआयचा कर्णधार विराट कोहलीला धक्‍का

प्रशिक्षक निवड प्रक्रियेतून केले बाजूला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात बीसीसीआयने जाहीरात देखील दिली आहे. पण यंदा होणारी प्रशिक्षकपदाची निवड ही पुर्णपणे वेगळी असणार आहे. नवा कोच कोण असणार याची चर्चा सुरू असताना बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेत या निवड प्रक्रियेतून विराट कोहलीला बाजूला केले आहे.

नव्या प्रशिक्षक निवडीसंदर्भात विराटचे मत विचारात घेतले जाणार नसल्याची माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे. गेल्यावेळी म्हणजेच 2007 मध्ये जेव्हा रवी शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती तेव्हा विराटचे मत विचारात घेण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षकसंदर्भातील अंतिम निर्णय माजी क्रिकेटपटू कपिल देव घेणार आहेत. त्यानंतर प्रशासकिय समिती यावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 2017 मध्ये जेव्हा प्रशिक्षक असलेले अनिल कुंबळे यांचा कालावधी वाढवण्यात आला नव्हता. तेव्हा देखील विराट कोहलीचे मत विचारात घेतले होते. इतक नव्हे तर विराटच्या म्हणण्यानुसारच कुंबळे यांना पदावरून हटवण्यात आले होते. कोहलीने कुंबळेसोबत काम करण्यास हरकत घेतली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)