बिपाशाचे नवऱ्याबरोबर कमबॅक

करण सिंह ग्रोवर आणि त्याची पत्नी बिपाशा बासू लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. बऱ्याच दिवसांनी बिपाशा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार आहे. तिच्या फॅन्ससाठी हे कमबॅक निश्‍चितच आनंददायी असणार आहे. “आदत’ सिनेमामध्ये हे दोघेही पती-पत्नी एकत्र दिसणार आहेत. करणने अलिकडेच एका इंटरव्ह्यूमध्ये बिपाशाबरोबर काम करणे किती छान असते, हे सांगितले. बिपाशा खूपच शिस्तप्रिय आहे. मात्र मी स्वतः त्याच्या अगदी उलट आहे, असे करणने सांगितले.

बिपाशामध्ये खूप एनर्जी आहे. तिच्याबरोबर काम करण्याने कधी कोणताही “डल मोमेंट’ येत नाही. घरी अथवा कामाच्या ठिकाणी बिपाशाच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायला आपल्या आवडत असल्याचेही करणने सांगितले. यापूर्वी करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बासूने “अलोन’मध्ये एकत्र काम केले होते. हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. “आदत’ हा एक रोमॅंटिक थ्रिलर असणार आहे. यामध्ये करण आणि बिपाशाच्या बरोबर माजी मिस इंडिया नताशा सूरी आणि “बिग बॉस’ची स्पर्धक सोनाली राऊतपण असणार आहे. गायक मीका सिंग हा या सिनेमाची निर्मिती करतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)