बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन नाही – सचिन तेंडूलकर

मुंबई – मी मुंबई इंडियन्स आयपीएल संघाकडून कोणताही मोबदला घेत नाही. त्यामुळे माझ्याकडून बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही, असे स्पष्टीकरण सचिन तेंडुलकर याने देताना आपल्यावरी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

बीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी पाठवलेल्या नोटीशीला दिलेल्या 14 मुद्‌द्‌यांचा अंतर्भाव असलेल्या उत्तरात तेंडुलकरने सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. आपण मुंबई इंडियन्स या आयपीएल संघाचे मार्गदर्शक असून बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या नियमावलीत उल्लेख केलेल्या कोणत्याही पदावर काम करत नाही, असेही तेंडुलकर याने लेखी उत्तरात म्हटले आहे.

यावेळी सचिनने असे नमूद केले की, मुंबई इंडियन्ससाठीच्या योगदानाचा कोणताही मोबदला आपण संघाकडून घेत नसून त्यासाठीचे कोणतेही अधिकृत कार्यालयीन पद मी स्वीकारले नाही. मार्गदर्शक म्हणून काम करत असताना संघाबाबत कोणताही निर्णय घेण्याची जबाबदारीरी आपल्यावर नाही. तसेच माझ्या अनुभवाच्या आधारे मुंबई इंडियन्स संघाला योग्य ते मार्गदर्शन करणे हे माझे काम आहे. हा मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाचा भाग आहे. बीसीसीआयच्या नियम 38 (4) (जे) यात उल्लेख केल्याप्रमाणे गव्हर्नन्स, मॅनेजमेट आणि एम्ल्पॉयमेंटशी संबंधित कोणतेही पद मी भूषवित नाही, असे स्पष्टीकरण तेंडुलकरने दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.