रांजणगाव गणपती -येथील श्री खंडोबा देवाची यात्रा चैत्र अमावस्येला 30 एप्रिल रोजी होणार आहे. बैलगाडा शर्यतीसाठी 9 लाख 55 हजार 555 रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आल्याची माहिती आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिली.
पाचुंदकर म्हणाले की, गेल्या वीस वर्षांपासून श्री खंडोबा देवाची यात्रा भरते. करोना काळात दोन वर्षे यात्रा होऊ शकली नाही. मात्र, यावर्षी ग्रामस्थांच्या पुढाकाराने यात्रा भरणार आहे. बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकास 1 लाख 55 हजार 555 रुपयांचे बक्षिस देण्यात येईल. व्दितीय क्रमांकास 1 लाख 11 हजार 111, तृतीय 77 हजार 777, चतुर्थ 41 हजार 111, तर पाचव्या क्रमांकास 25 हजार 555 रुपयांचे बक्षीस आहे.
फायनल प्रथम क्रमांकास बुलेट, व्दितीय क्रमांकास स्प्लेंडर, तृतीय क्रमांकास प्लॅटिना दुचाकी बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहे. प्रत्येक फळीफोड गाड्यांना ट्रॉफी देण्यात येणार आहे. घाटाचा राजा म्हणूद 22 हजार 222 रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. फळीफोड गाड्यास प्रथम क्रमांक, व्दितीय व तृतीय क्रमांकास 5 ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात येणार असल्याचे पाचुंदकर यांनी सांगितले.