चिंबळी- खेड तालुक्यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी परिसरात शेतकरी वर्गानी घेतले दुधी भोपळ्याच्या पिकात एका शेतकऱ्याने मक्याचे अंतरपीक घेण्याचा केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. गेल्यावर्षी खेड तालुक्यात पाऊस कमी प्रमाणात कोसळल्याने जनावरांच्या चाऱ्यांची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. परिणामी बाजार भाव वाढल्याने हिरवा चारा उपलब्ध व्हावा, म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर विविध प्रकारची पिके घेऊन जगवली आहे. दरम्यान, चिंबळी येथील एका शेतकऱ्याने दुधी भोपळ्याची लागवड करून त्यामध्ये जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करण्यासाठी टोकण पद्धतीने मका पिकाची लागवड केली होती.
इंद्रायणी नदीचे पाणी दूषित झाल्याने या पाण्यावर अवलंबून न राहता या शेतकऱ्याने विहिरीच्या पाण्याचा वापर करीत खुरपणी व खत-औषधांची फवारणी केली. तर गेल्या आठदिवसांपासून पहाटे थंड वारे वाहत अस्लयाने दुधी भोपळ्याचे व मका पीक चागंलेच तरारले असल्याने शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, मध्येच ढगाळ वातावरण तर मध्येच उन्हाचा पारा वाढत असल्याने मका पिकावर किडीरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने औषध फवारणीचा खर्च करावा लागत असल्यापने या शेतकऱ्याचे गणित कोलमडले आहे.