रमझान महिन्यात जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांविरोधात संघर्षविरामाची मेहबुबा मुफ्ती यांची मागणी

श्रीनगर – मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमझानच्या महिन्यामध्ये जम्मू काश्‍मीर राज्यात दहशतवाद्यांविरुद्धच्या एकतर्फी सशस्त्र कारवाईची किंवा संघर्ष विरामाची अंमलबजावणी करण्याची मागणी, पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज केली आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला आवाहन करत, रमझानचा महिना संपल्यावर येणारी ईद हा सगळ्यांत मोठा सण असतो. त्यामुळे या काळात अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. गेल्या वर्षी रमजान दरम्यान केंद्र सरकारकडून संघर्षविराम जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे यंदा देखील सर्च ऑपरेशन आणि एकतर्फी कारवाई थांबवावी. जेणेकरून राज्यातील लोक रमझानचा महिना शांततेमध्ये सणसाजरा करू शकतील, असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हंटले आहे.

यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकार सोबतच उग्रवाद्यांना देखील शांततेचे आवाहन केले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.