पुणे : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात विद्यार्थी व शिक्षकांना अमानुष मारहान करत मोठया प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पुण्यात झाशीची राणी पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच संबधितांवर कडक करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
माजी महापौर प्रशांत जगताप माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके , निलेश निकम , राकेश कामठे, शहर युवक अध्यक्ष महेश हांडे , श्रीकांत पाटील , खुणे पाटील,बापू डाकले , संतोष नांगरे, फहीम शेख , स्वप्नील दुधाणे, मनोज पाचपुते,रुपेश संत ,किरण खैरे ,अमोल ननावरे, अविनाश भांड , निशिकांत कांबळे, अभिषेक जाधव,अचुत लांडगे, स्वप्नील थोरवे, मंगेश जाधव,ओंकार कार्ले, गोविंद पवार,प्रशांत प्रबाळे ,प्रमोद शिंदे यावेळी उपस्थित होते.