मुंबई: नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचारप्रकारणी सर्वच स्तरातून निषेध नोंदवण्यात येत आहे.
Why do you need to cover your face? Because you know you are doing something wrong, illegal & punishable. There is no honour in this-Its horrific to see the visuals of students & teachers brutally attacked by masked goons inside JNU-Such violence cannot & should not be tolerated
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 5, 2020
जेएनयूमधील हल्ल्याविषयी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांनी देखील हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी एक ट्विट केले असून ‘तुम्ही चुकीचं काम करत होता म्हणून चेहरा झाकून आलात.’ असं म्हणत रितेश देशमुखने हल्लेखोरांवर टीका केली आहे.
तुम्हाला चेहरा झाकण्याची काय गरज? तुम्ही चुकीच्या मार्गाने अवैध काम करता आहात. हे काही चांगले काम नाही. जेएनयूमध्ये गुंडांनी केलेल्या हल्ल्याचे दृश्य भीतीदायक आहेत. अशा प्रकारची हिंसा सहन केली जाऊ शकत नाही असे ते म्हणाले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री विद्यार्थी आणि शिक्षकांवर अज्ञात लोकांनी हल्ला केला होता. यात विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयष घोष या गंभीर जखमी झाल्या आहेत.