सासवड – अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात करोनामुळे सहभागी होता आले नसले तरी “जय श्रीरामा’च्या जयघोषात सासवड येथील भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून संपूर्ण बाजारपेठ व पोलीस ठाण्यामध्ये 50 किलो पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन सासवड पोलिसांनी मंगळवारी (दि. 5) केले होते. त्याला प्रतिसाद देत संपूर्ण सोशल डिस्टंसिंग व नियमांचे काटेकोरपणे पालन करून जन्मभूमीच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळ्याला शुभेच्छा देत आंनोदोत्सव साजरा केल्याचे पुरंदर तालुका अध्यक्ष आर. एन. जगताप व कार्याध्यक्ष निलेश जगताप यांनी सांगितले. यावेळी सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, शेखर वढणे, गणेश भोसले, बाळासाहेब चव्हाण, श्रीकांत ताम्हाणे, श्रीकांत थिटे, नदीम इनामदार, ऍड. पानसे, विजय पुरंदरे, अंकुश शिवरकर, राहुल बुद्धिवंत, विजय जगताप, उपस्थित होते.