नवी दिल्ली : लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्या या प्रकरणात आज उच्च न्यायालयात एसआयटीकडून संपुर्ण प्रकरणाविषयीचा स्थिती अहवाल दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणात खंडणी मागणारे विद्यार्थी हे आज न्यायालयात अटकपुर्व जामिनाची मागणी करणारी याचिका दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्वामी चिन्मयानंद यांना लैगिंक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एका विद्यार्थीनीने एक व्हिडीओच्या माध्यमातून तिच्यावरील अत्याचाराची माहिती दिली होती. दरम्यान, या प्रकरणात आणखी तीन जणांना एसआयटीने दोषी मानले आहे. तीन विद्यार्थ्यांनी या प्रकरणात चिन्मयानंद यांच्याकडे पैशांची मागणी केली होती यात पीडित तरूणीदेखील दोषी असल्याचे समोर आले होते त्यामुळे या प्रकरणात तिला देखील अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या तिला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे जर तिला अटकपुर्व जामिन मंजुर झाला नाही तर तिलादेखील अटक होण्याची शक्यता आहे.