मुंबई – बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) मागील काही दिवसांपासून ‘सॅम बहादुर’ (Sam Bahadur) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विकीच्या या चित्रपटाची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. नुकतेच या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आली आहे.
यापूर्वी त्याने या चित्रपटातील त्याचा लूक पोस्ट केला होता. यानंतर आता विकी कौशलने ‘सॅम बहादुर’चा फर्स्ट लुक त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये विकी सॅम बहादुर यांच्या पोषाखात पाठमोरा उभा असलेला दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने लिहिले की, ‘जिंदगी उनकी, इतिहास हमारा’. या चित्रपटातील विकीचा हा लुक चाहत्यांच्याही पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
अभिनेता विकी कौशल गेले काही महिने त्याच्या आगामी ‘सॅम बहादुर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहतेही विकीच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दलचे अपडेट्स विकी त्याच्या सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लूची व्यक्तिरेखा सान्या मल्होत्रा साकारणार असून, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत फातिमा सना शेखला पाहायला मिळणार आहे.