Entertainment News : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या सतत चर्चेत असते. नुकतीच समंथा खुशी या चित्रपटात दिसली. या चित्रपटातील तिची विजय देवरकोंडासोबत केमेस्त्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली. सध्या समंथाने तिच्या करिअरमधून ब्रेक घेतला आहे आणि सुट्टीचा आनंद घेत आहे.
अशातच समंथाचे माजी पती नागा नागा चैतन्यसोबत पॅचअप झाल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. घटस्फोटानंतर दोघेही पुन्हा एकत्र आल्याचे लोकांचे म्हणणे होते. मात्र अलीकडेच तिने या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. समंथाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, जे पाहून असे अंदाज बांधले जात आहेत की कदाचित समंथा आणि नागा चैतन्य पुन्हा कधीच एकत्र राहणार नाहीत.
समंथाने नागा चैतन्य नावाचा टॅटू काढला होता. घटस्फोटानंतरही समंथाने तो टॅटू हटवला नाही. त्यामुळे कदाचित दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना होती. पण आता अलीकडेच तिने इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
ज्यामध्ये ती पिंक कलरचा ड्रेस कॅरी करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या रिब्स फ्लॉंट करताना दिसत आहे. नागा चैतन्यशी लग्न केल्यानंतर समांथाने तिच्या बरगडीवर ‘चाय’ नावाचा टॅटू काढला होता. पण आता या फोटोमध्ये हा टॅटू दिसत नाहीये. या फोटोनंतर तिने तिच्या माजी पतीच्या नावाचा टॅटू काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
नुकतेच नागा चैतन्यने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सामंथाच्या कुत्र्याचा फोटो शेअर केला होता. यानंतर चाहत्यांना वाटू लागले की कदाचित दोघे पुन्हा एकदा पॅचअप करणार आहे. समंथा आणि नागा यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. 2021 मध्ये दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले. रिपोर्टनुसार, नागा आता अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट करत आहे.