Zimbabwe Cricket : झिम्बाब्वेचे अष्टपैलू खेळाडू वेस्ली माधेवेरे (Wessly Madhevere) आणि ब्रँडन मावुता (Brandon Mavuta) यांना डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं ही माहिती दिली.
बोर्डाने सांगितले की, वेस्ली माधेवेरे आणि ब्रँडन मावुता हे ड्रग्ज प्रकरणात पॉझिटिव्ह आढळून आले, त्यानंतर बोर्डाने कठोर निर्णय घेत दोघांनाही निलंबित केले आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार आता या प्रकरणावर सुनावणी होईपर्यंत दोघांना निलंबित करण्यात आले आहे. खेळाडूंवर आरोप निश्चित करण्यात आले असून ते लवकरच शिस्तभंगाच्या सुनावणीसाठी हजर होतील.
ZC suspends two players over recreational drug use
Details 🔽https://t.co/CS5pnD6aOO pic.twitter.com/Qy1kAjjU1P
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 21, 2023
क्रिकेटच्या इतिहासात बोर्डाने ड्रग्जसाठी खेळाडूंवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तथापि, झिम्बाब्वे क्रिकेटने वेस्ली माधेवेरे आणि ब्रँडन मावुता यांच्याबाबत म्हटले आहे की, दोघांवरही आचारसंहितेनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत आणि ते लवकरच सुनावणीसाठी हजर होतील. सुनावणी होईपर्यंत दोन्ही खेळाडू झिम्बाब्वेच्या सामन्यात सहभागी होणार नाहीत. त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
कशी राहिली दोन्ही खेळाडूंची कारकीर्द…?
वेस्ली माधवेरेने झिम्बाब्वेसाठी 2 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याचे खाते उघडले नाही, तर त्याने 36 एकदिवसीय सामन्यांमध्ये 705 धावा केल्या आहेत, तर 60 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 1047 धावा केल्या आहेत. तर मावुताने 4 कसोटी सामन्यात 12 धावा आणि 4 विकेट घेतल्या आहेत. 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 88 धावा आणि 10 विकेट, तर 10 टी-10 सामन्यांमध्ये 61 धावा आणि 4 विकेट घेतल्या आहेत. माधवेरे आणि मावुता हे दोघेही या महिन्याच्या सुरुवातीला आयर्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाचा भाग होते, तर मधवेरेने आयर्लंडविरुद्ध तीन T20 सामने आणि मॅशोनालँड ईगल्स संघासाठी एक स्थानिक प्रथम श्रेणी सामना खेळला होता.
AUS-W Vs IND-W 1st Test Day 1 Stumps : पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे Team India चे वर्चस्व…
दरम्यान, झिम्बाब्वे 2024 पुरुषांच्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही या आठवड्यात त्याच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक डेव्ह हॉटन यांनी राजीनामा दिल्यानंतर ही बातमी एक मोठा धक्का आहे. झिम्बाब्वे या वर्षी भारतात झालेल्या पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नव्हता.