टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२च्या सामन्यात झिम्बाब्वेचा पाकिस्तानचा पराभव करत मोठा उलटफेर केला. या सामन्यात झिम्बाब्वेने १३० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला १ धावेने पराभव पत्करावा लागला. बचावासाठी कमी धावसंख्या असतानाही झिम्बाब्वेने त्यांच्या दमदार क्षेत्ररक्षण आणि भेदक गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानला मोठा धक्का दिला.
दरम्यान या सामन्यात झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवचाही विक्रम मोडण्याची कामगिरी केली आहे. या सामन्यात रझाने पाकिस्तानच्या ३ गड्यांना बाद केले आणि तेथूनच सामन्याचे पारडे झिम्बाब्वेच्या दिशेने झुकले. या सामन्यात सिकंदर रझाला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीरचा किताबही मिळाला. सामनावीरचा पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत त्याने सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली या दोघांच्याही विक्रमांना मोडीत काढले आहे. एवढेच नाही तर २०२२ मध्ये रझाने झिम्बाब्वेसाठी तब्बल ९व्यांदा सामनावीरचा किताब पटकावला आहे.
#T20WorldCup | पराभव सहन न झाल्याने पाकिस्तानच्या शादाब खानला रडू कोसळले, व्हिडिओ व्हायरल!
सिकंदर रझाने सूर्यकुमारचा विक्रम मोडला
झिम्बाब्वेचा सिकंदर रझा २०२२ या वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक वेळा सामनावीरचा किताब जिंकणारा खेळाडू ठरला आहे. रझाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. रझाने यंदा सहाव्यांदा हा पराक्रम केला आहे. याबाबतीत त्याने सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. २०२२ मध्ये आतापर्यंत सूर्यकुमार यादवने ५ वेळा हा पुरस्कार पटकावलेला आहे.
२०२२ मध्ये टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू
६ वेळा – सिकंदर रझा
५ वेळा – सूर्यकुमार यादव
४ वेळा – कुसल मेंडिस
४ वेळा – मोहम्मद रिझवान
४ वेळा – ग्लेन फिलिप्स
विराटचाही विक्रम मोडीत काढला
सिकंदर रझाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक वेळा सामनावीरचा किताब जिंकण्याचा विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडला आहे. विराट कोहलीने 2016 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ वेळा ‘मॅच ऑफ द मॅच’ बनण्याचा पराक्रम केला होता. मात्र आता २०२२ मध्ये रझाने ७ वेळा हा पुरस्कार जिकून पहिले स्थान मिळवले आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार
७ – सिकंदर रझा (२०२२)
६ – विराट कोहली (२०१६)
५ – सूर्यकुमार (२०२२)
५ – मोहम्मद रिझवान (२०२१)
५ – शेन वॉटसन (२०१२)