पर्थ : T20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानच्या संघाचा सलग दुसरा पराभव झाला आहे. भारतानंतर झिम्बाब्वेनेही पाकिस्तानचा पराभव केला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर 131 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला आठ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 129 धावा करता आल्या आणि एका धावेने सामना गमावला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
🇿🇼 beat Pakistan 🇵🇰 by one run! 🔥#PAKvZIM | #T20WorldCup pic.twitter.com/jTgHlwzC9r
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) October 27, 2022
झिम्बाब्वेने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती, पण शाहीन आफ्रिदीला केवळ एक धाव करता आली आणि पाकिस्तानच्या संघाने सामना गमावला. 2022 च्या टी-20 विश्वचषकातील हा पाचवा उलटफेर आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर 131 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ गडी गमावून केवळ 129 धावाच करू शकला आणि एका धावेने सामना गमावला.
झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सने सर्वाधिक 31 धावा केल्या. त्यांच्याशिवाय क्रेग इर्विन आणि ब्रॅड इव्हान्स यांनी प्रत्येकी 19-19 धावा केल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने तीन आणि मोहम्मद वसीम ज्युनियरने चार विकेट घेतल्या.
पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 44 धावा केल्या. मोहम्मद नवाजने 22 आणि शादाब खानने 17 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने तीन आणि ब्रॅड इव्हान्सने दोन बळी घेतले.
दरम्यान, याआधी या T20 विश्वचषकात वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि श्रीलंकेचे संघ उलटफेरचे बळी ठरले आहेत. आता पाकिस्तानही उलटफेरचा बळी ठरला आहे.